No. STEM/ Date :- 2023/11/24
प्रति,
महाव्यवस्थापक (परिचलन/प्रकल्प/पुर्ण ठेव)
स्टेम वॉटर डिस्ट्री, अॅण्ड इनफ्रा. के. प्रा.लि.,
ठाणे.
विषय : सन २०२३-२४ चे सुधारित व सन २०२४-२५ चे मुळ अंदाजपत्रक (Budget) तयार करणे.
संदर्भ :
एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत झालेला खर्च व पुढील ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ मधील अपेक्षित खर्च विचारात घेवून सन २०२३-२४ चे सुधारित व सन २०२४-२५ चे मुळ अंदाजपत्रक तयार करुन संचालक मंडळ यांचे मंजुरीसाठी वेळीच सादर करावयाचे असल्याने आपणास सुचित करण्यात येते की, खालील माहिती दि.१०.१०.२०२३ पुर्वी सादर करावी.
1) ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ मध्ये होणारा अपेक्षित खर्च (लेखा शिर्ष व निविदा करारनाम्यांच्या- सविस्तरसह)
2) ज्या लेखाशिष / उप-शिर्ष वर २०२३-२४ मध्ये मंजुरी पेक्षा जास्त खर्च होणार आहे. त्याची सविस्तर कारणे व सुधारित तरतुद व कामांची निकडीसह यादी निहाय तपशिल / रिअॅप्रोप्रिएशन तपशिल तक्तासह.
3) सन २०२३-२४ चे मुळ मंजुर बजेट मध्ये तरतुद नसताना करण्यात आलेली कामे व झालेला खर्च होणारा खर्च व सविस्तर कारणे व करावयाची तरतुद.
4) सन २०२४-२५ मधील लेखाशिर्ष / उपशिर्ष प्रमाणे येणारी कामे व होणारा अपेक्षित खर्च करारनामा निविदा तपशिल. महसुली आणि भांडवली खर्चाचे वर्गीकरण करून सादर करण्यात यावेत.
5) सन २०२३-२४ चे मुळ मंजुर बजेट मध्ये मंजुर व तरतूद केलेली परंतू न केलेली कामे तपशिल.
संकेत घरत
व्यवस्थापकीय संचालक,
स्टेम वॉटर डिस्ट्री आणि इन्फ्रा कंपनी प्रा.लि.,
ठाणे